Go With The Flow

मासिक पाळी न आल्यास काय करावे: मासिक पाळी लवकर येण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय (How to Get Your Periods Immediately: Effective Ways to Induce Your Period)

Rate this artcile
[Total: 3 Average: 3]
असे काही दिवस असतात जेव्हा तुम्हाला मासिक पाळी उशीरा येते. मग असे दुर्मिळ दिवस देखील असतात, जेव्हा तुम्ही मासिक पाळी लवकर यावी याची आतुरतेने वाट पाहता आणि देवाला प्रार्थना करता. तुमच्यापैकी काही जणी म्हणतील की, का? म्हणजे मासिक पाळी उशिरा येण्याऐवजी लवकर यावी असे कुणाला का वाटेल? आता पाहा, तुम्ही ट्रिपला जात असाल तर मासिक पाळी त्रासदायक ठरू शकते, त्यामुळे एखाद्या व्यक्तीला पाळी लवकर यावी असे वाटू शकते किंवा तुम्हाला बाळ हवं असेल, तर अनियमित पाळीमुळे तुम्हाला गर्भधारणा होण्यास अडचणी येतात. म्हणून, तुम्ही पाळीवर लक्ष ठेवून असता किंवा तुमची मासिक पाळी नियमित होण्याऐवजी खूप उशीर येत असल्यामुळे तुम्ही तणावग्रस्त होत असता.

तुम्हाला मासिक पाळी उशीरा का येते? (Why Are Your Periods Delayed?)

मासिक पाळी सुरळीतपणे यावी, यावर उपाय जाणून घेण्यापूर्वी, तुम्हाला मासिक पाळी उशिरा का येते, हे समजून घेणे आवश्यक आहे. मासिक पाळीला विलंब होण्यासाठी काही सामान्य घटक कारणीभूत आहेत:
  • तणाव: तणावामुळे बऱ्याचदा खूप त्रास होऊ शकतो. मानसिक आणि भावनिक तणावामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते, ज्यामुळे मासिक पाळीला विलंब होतो.
  • हार्मोन्सचे असंतुलन: हार्मोन्समधील अस्थिरता, विशेषतः एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोनमुळे तुमच्या नियमित मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो.
  • वजन: कमी कालावधीत लक्षणीयरित्या वजन कमी होणे किंवा वाढणे, यामुळे हार्मोन्सच्या निर्मितीवर परिणाम होऊ शकतो ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होते.
  • वैद्यकीय परिस्थिती: पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), थायरॉईड आणि प्रजनन समस्या, या काही वैद्यकीय समस्या आहेत ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते.
  • औषधे: काही औषधे, जसे की हार्मोनल कॉंट्रासेप्टिव्ह्ज किंवा ऍंटीडिप्रेसेंट्स मासिक पाळीवर परिणाम करू शकतात.

Our products

RIO Heavy Flow Sanitary Pads

RIO Cottony Soft Sanitary Pads

RIO Comfort Weave Sanitary Pads

मासिक पाळी लवकर येण्यासाठी काय करावे / मासिक पाळी न आल्यास काय करावे? (How to make periods come faster?)

होय! वाचताना थोडे विचित्र वाटेल पण, हे शक्य आहे. असे बरेच पदार्थ आहेत ज्यामुळे तुमची मासिक पाळी लवकर येऊ शकते. हे पदार्थ गर्भाशयात आकुंचन निर्माण करुन, गर्भाशयाचे अस्तर मऊ करून, तुमच्या शरीरात एस्ट्रोजेन हार्मोन निर्माण करून कार्य करू शकतात.

मासिक पाळी लवकर येण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय / मासिक पाळी लवकर येण्यासाठी उपाय  (Effective Home Remedies to get Periods Immediately)

मासिक पाळी लवकर येण्यासाठी हे घरगुती उपाय मार्गदर्शक ठरतील.
   • ओवा

ओवा गर्भाशयात आकुंचन निर्माण करतो. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि एपिओलचे प्रमाण जास्त असते. जे गरोदर आहेत किंवा ज्यांना गरोदर व्हायचे आहे, स्तनपान करत आहेत किंवा ज्यांना किडनीच्या समस्या आहेत, अशा लोकांना आम्ही जास्त प्रमाणात ओवा खायला सांगत नाही. ओव्याचा चहा बनवण्यासाठी, एक कप उकळत्या पाण्यात दोन चमचे ओवा घाला आणि ओवा ५ मिनिटे व्यवस्थित मिसळल्यानंतर हा चहा प्या.
   • जिरे (Cumin)

जिर्‍यामुळे तुमच्या गर्भाशयाच्या भिंती आकुंचित होतात, ज्यामुळे मासिक पाळी नियमित होते. १-२ चमचे जिरे रात्रभर भिजत ठेवू शकता किंवा तुम्ही २-३ मिनिटे उकळ काढू शकता. पाणी गार झाल्यावर जिरे काढून टाका. आता हे पाणी तुम्ही गाळून पिऊ शकता. मासिक पाणी येण्यासाठी पिढ्यानपिढ्या वापरली जाणारी ही एक पारंपारिक पद्धत आहे.
   • पपई (Papaya)

पपईमध्ये कॅरोटीन असते, जे शरीरात एस्ट्रोजेनची पातळी वाढण्यास मदत करते, ज्यामुळे मासिक पाळी येते. मासिक पाळी सुरू होण्याच्या काही दिवस आधी पपई खाण्याचा सल्ला दिला जातो.
   • आले (Ginger)

जरी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नसले तरी मासिक पाळी लवकर येण्यासाठी आले ही एक आश्चर्यकारक औषधी वनस्पती आहे. कच्चे आले चावून खाल्याने तुम्हाला वाईट स्वप्न पडू शकतात, म्हणून आल्याचा चहा बनवून प्या. आले सोलून त्याचे तुकडे करा. पाण्यात ५-७ मिनिटे उकळवा. गाळून घ्या आणि गोडाव्यासाठी थोडे मध घाला. अरे वाह! झाला तुमचा आल्याचा चहा तयार.
   • हळद (Turmeric)

सर्व समस्यांसाठी एकमेव उपाय म्हणजे हळद. या अद्भुत हळदीमध्ये आश्चर्यचकित करणारे उपचारात्मक गुणधर्म आहेत. हळदीमुळे गर्भाशयाचा विस्तार होतो आणि त्यामधील रक्त प्रवाह देखील उत्तेजित होतो. तुम्ही हळदीमध्ये मध घालू शकता, हळदीचे दूध पिऊ शकता किंवा खमंग स्वाद आणण्यासाठी याचा वापर आमटीमध्ये करु शकता.
   • धणे (Coriander Seeds)

मासिक पाळी लवकर कशी येईल? त्यासाठी धणे हा सर्वोत्तम मार्ग आहे! यामध्ये आश्चर्यकारक एमेनेगॉग गुणधर्म असतात, जे मासिक पाळीच्या रक्त प्रवाहाला उत्तेजित करतात आणि वाढवण्यास मदत करतात. धणे पाण्यात तोपर्यंत उकळवा, जोपर्यंत पाणी घेतलेल्या प्रमाणापेक्षा अर्धे होत नाही. आता पाणी गार होऊ द्या आणि हे पाणी दिवसातून तीन वेळा प्या. मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी काही दिवस आधी हा उपाय करु शकता. यामुळे तुमची प्रजननक्षमता वाढेल आणि गर्भाशयामध्ये पुष्कळ रक्त प्रवाह होऊ शकेल.
   • बडीशेप (Fennel Seeds)

मासिक पाळी सुरू होण्याच्या काही दिवस आधी स्टारबक्स सोड्याचा आस्वाद घ्या तसेच दररोज सकाळी एक कप सुगंधी बडीशेप चहा अवश्य प्या. या रेसिपीसाठी बडीशेप रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी काढून टाका.

मासिक पाळी लवकर येण्यासाठी उपाय - योगासने (Yoga Asanas to Get Periods Faster)

योग ही एक प्राचीन पद्धत आहे. योगामुळे हार्मोन्सच्या संतुलनास चालना मिळते आणि मासिक पाळी नियमित होते, त्याचबरोबर योगाचे असंख्य आरोग्यात्मक फायदे आहेत. योगामुळे ताबडतोब मासिक पाळी येऊ शकते हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नसले तरी, मलासन, उस्त्रासन आणि मत्स्यासन यासारखी काही योगासने प्रजनन क्षमता असलेल्या अवयवांना चालना देतात, यामुळे श्रोणी भागात रक्त प्रवाह वाढतो आणि तणाव कमी होतो, यामुळे मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते. सुरुवात कशी करायची असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ’बिगिनर किंवा लेव्हल १’ योगासने ऑनलाइन पाहू शकता. दिवसातून ३० ते ४० मिनिटे अशाप्रकारे आठवड्यातून ५ वेळा योगाभ्यास केल्याने हार्मोन्स सुरळीत होतात आणि मासिक पाळी पुन्हा नियमित होऊ लागते.

मासिक पाळी लवकर येण्यासाठी उपाय - जीवनशैलीत बदल करा (Lifestyle Changes to Get Periods Immediately)

जीवनशैलीतील बदल तुमच्या मासिक पाळीचे नियमन करण्यात आणि संपूर्ण हार्मोनल संतुलनास प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मासिक पाळी नियमित करण्यासाठी तुमची जीवनशैली कशी असावी, याचे काही उदाहरण आम्ही इथे दिले आहेत:
   • तणावाचे व्यवस्थापन:तणावाची पातळी कमी करण्यासाठी ध्यान, दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम किंवा निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे यांसारख्या मनाला शांत करणार्‍या गोष्टी करा. ज्या गोष्टी करण्यात तुम्हाला आनंद वाटतो, त्या गोष्टी केल्याने तणाव कमी करण्यासाठी मदत होऊ शकते.
   • नियमितपणे व्यायाम करा:नियमित शारीरिक हालचाली केल्याने हार्मोन्सचे नियमन होते आणि एकूणच आरोग्य चांगले राहते. वेगात चालणे, सायकल चालवणे किंवा पोहणे यासारखे व्यायाम अवश्य करा. जास्त वेगाने केले जाणारे आणि शारीरिक ताण निर्माण करणारे व्यायाम टाळा, कारण यामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते.
   • संतुलित आहार घ्या:अशी फळे आणि भाज्या खा, ज्या तुम्हाला आवश्यक असलेली सर्व जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक तत्वे प्रदान करतील. प्रोसेस्ड फूड, साखरयुक्त नाश्ता, कॅफीन आणि अल्कोहोल यांचे अतिसेवन टाळा, यामुळे तुमच्या मासिक पाळीमध्ये अनियमितता येऊ शकते.
   • पुरेशी झोप घ्या:पुरेशी शांत झोप घेणे हार्मोनल संतुलनासाठी आवश्यक आहे. तुमच्या शरीराची नैसर्गिक लय राखण्यासाठी दररोज रात्री ७-९ तास झोप घ्या.
   • योग्य वजन राखा:कमी वजन आणि जास्त वजन दोन्ही हार्मोनल संतुलनावर आणि मासिक पाळीच्या नियमिततेवर परिणाम करू शकतात. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करुन योग्य वजन राखण्याचा प्रयत्न करा.
लक्षात ठेवा की जीवनशैलीतील सकारात्मक बदलांचा तुमच्या मासिक पाळीवर परिणाम होण्यास वेळ लागू शकतो. पाळी येण्यासाठी उपाय करत असताना धीर धरा आणि सातत्य ठेवा. कालांतराने, तुम्हाला तुमच्या प्रयत्नांची गोड फळे नक्कीच चाखायला मिळतील.

मासिक पाळी लवकर येण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे धोके (Risks of inducing periods)

मासिक पाळी लवकर येण्यासाठी तुमची स्वतःची अशी वेगळी कारणे असू शकतात. मात्र तुमच्या लक्षात येईल की यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे हे नैसर्गिक मासिक पाळी चक्राच्या विरुद्ध आहे. अर्थात यामध्ये काही धोके देखील आहेत. म्हणजे पाळी लवकर येण्यासाठी वरील उपाय करताना तुम्हाला अगदी धोडासा त्रास होऊ शकेल किंवा कोणताही धोका निर्माणही होणार नाही. मात्र जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची अलर्जी असेल तर हे करणे टाळा.

मासिक पाळी लवकर येण्यासाठी औषधे घेणे सुरक्षित आहे का? (Is It Safe to Take Medications to Induce Periods?)

तुम्ही तुमची पाळी येण्यासाठी औषधे घेण्याचा विचार करत असाल तर, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. ते तुमची विशिष्ट समस्या समजून घेतील आणि आवश्यक असल्यास योग्य औषधे लिहून देतील. स्वत:च औषधोपचार करणे धोकादायक ठरु शकते तसेच जोखीम आणि दुष्परिणाम होऊ शकतात. डॉक्टरांना कधी भेटायचे? तुम्ही पौगंडावस्थेत असताना, गर्भधारणेनंतर आणि रजोनिवृत्ती येण्याच्या काळात मासिक पाळीमध्ये बदल होणे हे पूर्णपणे सामान्य आहे. तथापि, जर तुमची मासिक पाळी अचानक अनियमित झाली तर तुम्ही लगेच स्त्रीरोगतज्ञांशी संपर्क साधला पाहिजे. मासिक पाळी लवकर येण्यासाठी काय करावे, हे आता तुम्ही जाणून घेतले. तुमच्या शरीरात प्रजननासंबंधित आणखी काही बदल घडत असतील तर तुम्हाला मदत करायला आम्हाला नक्कीच आवडेल. त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपली समस्या लिहा. आता भेटू तुमच्या लेखात:)

वारंवार विचारले जाणारे प्रश्न: (FAQs:)

मासिक पाळी लवकर येण्यासाठी उपाय /सर्वोत्तम आहार कोणता आहे? (What is the best food to get periods early?)

मासिक पाळी लवकर येण्यासाठी इथे काही सर्वोत्तम पदार्थ दिले आहेत:
   • ओवा
   • जिरे
   • पपई
   • आले
   • हळद
   • धणे
   • बडीशेप

मासिक पाळी लवकर येण्यासाठी झोपण्याची पद्धत कशी असावी? (What is the best sleeping position to get periods early?)

झोपण्याच्या पद्धतीमुळे तुमच्या मासिक पाळीच्या वेळेवर परिणाम होऊ शकतो, या विधानाला पुष्टी देणारे कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. मासिक पाळी हार्मोनल बदलांद्वारे नियंत्रित होते आणि झोपण्याच्या पद्धतीचा मासिक पाळी येण्याबाबत कोणताही संबंध नाही.

मासिक पाळी येण्यास किती विलंब होतो? (How much delay in periods is normal?)

मासिक पाळी येण्यासाठीचा वेळ प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकतो. सामान्यतः मासिक पाळी येण्याचा काळ २१ ते ३५ दिवसांपर्यंत असू शकतो, मासिक पाळीमधील रक्तस्त्राव सुमारे ३ ते ७ दिवस होतो. तुमच्या मासिक पाळी चक्राच्या कालावधीत अधूनमधून होणारा बदल हा अगदीच सामान्य असतो. तणाव, हार्मोनल बदल, आहार किंवा जीवनशैली यासारख्या घटकांमुळे हा बदल होऊ शकतो. तथापि, मासिक पाळीत सतत अनियमितता येत असेल किंवा अधिक विलंब होत असेल तर, आरोग्यासंबंधी कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

कोणत्या टॅब्लेटमुळे मासिक पाळी लवकर यायला मदत होते? (Which tablet helps periods immediately?)

हे लक्षात घेतले पाहिजे की तुम्ही कोणतीही टॅब्लेट किंवा औषधे स्वतःहून घेतली तर त्यामुळे लगेच मासिक पाळी येणार नाही. विशिष्ट परिस्थितींमध्ये मासिक पाळीचे नियमन करण्यासाठी हार्मोनल औषधे, जसे की ओरल कॉंट्रॅसेप्टिव्ह्ज, डॉक्टर लिहून देतील. तथापि, अशी औषधे केवळ वैद्यकीय देखरेखीखाली आणि निर्धारित केल्यानुसार वापरली पाहिजेत.

एका दिवसात/एका तासात मासिक पाळी येण्यासाठी उपाय  / एका दिवसात/एका तासात मासिक पाळी त्वरित कशी येईल? (How to get periods immediately in one day/one hour?)

एका दिवसात किंवा एका तासात मासिक पाळी येणे वैद्यकीयदृष्ट्या शक्य नाही. जेव्हा गर्भाशयाचे अस्तर घट्ट होते तेव्हा पाळी येते आणि ही प्रक्रिया जलद गतीने होऊ शकत नाही किंवा एका तासाच्या किंवा अगदी एका दिवसाच्या कमी कालावधीत घडू शकत नाही.

रात्रभरात मासिक पाळी येण्यासाठी उपाय / रात्रभरात मासिक पाळी कशी येईल? (How to get periods overnight?)

तुम्हाला रात्रभरात मासिक पाळी येऊ शकत नाही. मासिक पाळी येण्यासाठी काही नैसर्गिक मार्ग आहेत, तरी सुद्धा पाळी यायला काही दिवस लागतात. कोणताही त्रासदायक मार्गाचा अवलंब करु नका आणि जर तुम्हाला २ महिन्यांहून अधिक काळ मासिक पाळी आली नसेल, तर इतर कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

एका दिवसात पाळी येण्यासाठी घरगुती उपाय / एका तासात मासिक पाळी कशी येईल? (How to get your period in one hour?)

मासिक पाळी एका तासात किंवा एका दिवसातही येणे शक्य नाही. असे काही पीरियड लवकर येण्यासाठी उपाय आहेत जे तुम्ही करु शकता. पण तरी देखील मासिक पाळी यायला आणखी काही दिवस लागतील. तोपर्यंत, मासिक पाळी लवकर येण्यासाठी हे घरगुती उपाय करून पहा:
   • ओवा
   • जिरे
   • पपई
   • आले
   • हळद

प्रयत्नपूर्वक माझी मासिक पाळी लवकर येऊ शकते का? (Can I make my period come quickly?)

होय, मासिक पाळी येण्याचे नैसर्गिक मार्ग आहेत. तुम्ही पपई खाऊ शकता, हळदीचे दूध, आल्याचा चहा इ. सेवन करु शकता. तुमची मासिक पाळी लवकर येण्यासाठी यापैकी कोणतीही पद्धत वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली नसली तरी, या पद्धती सुरक्षित आहेत आणि काही लोकांमध्ये प्रभावी ठरु शकतात. जर तुम्हाला वैद्यकीय समस्या असेल तर, औषधे घ्या किंवा एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असेल, तर सर्वप्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मासिक पाळी येण्यासाठी काय करावे? / मासिक पाळी लवकर येण्यासाठी उपाय सांगा. (How to get periods?)

मासिक पाळी म्हणजेच पीरियड्स ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे जी सामान्यत: पौगंडावस्थेत सुरू होते आणि रजोनिवृत्तीपर्यंत चालू राहते. मासिक पाळी "येण्यासाठी" आपल्याला सक्रियपणे काहीही करण्याची आवश्यकता नाही; साधारणपणे, ९ ते १६ वयोगटातील मुलींना मासिक पाळी येण्यास सुरुवात होते, परंतु प्रत्येकामध्ये वेगळी लक्षणे दिसतात. जर तुम्हाला मासिक पाळी आली नसेल आणि म्हणून तुम्ही काळजी करत असाल तर, तुमचे प्रजननसंबंधी आरोग्य चांगले आहे, याची खात्री करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मासिक पाळी त्वरित येण्यासाठी काय प्यावे? / मासिक पाळी एका दिवसात येण्यासाठी घरगुती उपाय (What is best to drink to get periods immediately?)

मासिक पाळी एका दिवसात येण्यासाठी घरगुती उपाय किंवा कोणतेही मार्ग नाहीत. तुमचे शरीर अशाप्रकारे काम करत नाही. तथापि, तुम्ही खालील चारपैकी एखादे पेय घेऊ शकता:
   • हळदीचे दूध
   • आल्याचा चहा
   • धण्याचे गरम पाणी
   • जिऱ्याचे गरम पाणी
People Also Searched And Readअपने पीरियड्स जल्दी लाने के उपाय | Apne Periods Jaldi Lane Ke Upay | How To Get Your Periods Immediately

Comments

facebook twitter whatsapp whatsapp
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Start using RIO Heavy Flow Pads during your heavy flow

Anti-bacterial SAP

Guards not wings

Odour lock

x

RIO is at the centre of every peRIOd!

Sign up to stay connected with us!