Go With The Flow

मासिक पाळी नियमित येण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedy for Irregular Periods)

Rate this artcile
[Total: 0 Average: 0]
पाळी येण्याचा कालावधी लांबत असेल तर कुठल्याही स्त्रीला काळजी वाटणं स्वाभाविक आहे. आम्ही ज्याबद्दल बोलत आहोत, तो प्रसंग तुमच्या बाबतीत घडला नसेल तर तुम्ही खरंच भाग्यवान आहात. सरासरी मासिक पाळी येण्याचा कालावधी २८ दिवस असतो. सगळ्यांचीच शरीरं जशी सारखी नसतात, तीच गोष्ट स्त्रीयांच्या मासिक पाळीच्या बाबतीतही लागू होते. तुमची मासिक पाळी येण्याचा कालावधी दर महिन्याला बदलू शकतो. जर तुमची पाळी मागील कालावधीच्या पहिल्या दिवसापासून २४ ते ३८ दिवसांमध्ये केव्हाही आली तरी ती सामान्य मानली जाते. जर तुमची मासिक पाळी वर नमूद केलेल्या दिवसांपेक्षा खूप आधी किंवा नंतर येत असेल किंवा तुमच्या पाळीचा कालावधी फार मोठ्या फरकाने लांबत असेल तरच ती अनियमित मानण्यात येते. मासिक पाळी अनियमित होण्याची कारणं अनेक आहेत जसं ताणतणाव, निकृष्ट आहार, हार्मोनल असंतुलन, आजार, आणि इतर आनुवांशिक घटक. मासिक पाळीवर उपचार त्या त्या कारणांवर अवलंबून असतात. परंतु मासिक पाळी येण्यासाठी घरगुती उपाय देखील आहेत. तर आता हे वाचा आणि अनियमित मासिक पाळीवर केल्या जाणारे काही सर्वोत्कृष्ट उपाय करुन पाहा.

अनियमित मासिक पाळीची कारणे (Causes of Irregular Periods)

हार्मोनल असंतुलन जसे एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या पातळीतील चढ उतार यांसारख्या कारणांमुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते. ताणतणाव, वजन जास्त किंवा कमी होणं अणि लठ्ठ्पणा यामुळेसुद्धा मासिक पाळी अनियमितपणे येते. पीसीएओएस, थायरॉइड यांसारख्या वैद्यकीय समस्यांमुळे देखील त्यात भर पडू शकते. याशिवाय अतिरिक्त व्यायाम, विशिष्ट औषधं, आणि प्रजननसंबंधी समस्या यांसारखी मूलभूत कारणंही असू शकतात. अनियमित मासिक पाळीचं योग्य निदान आणि त्यावरील अचूक व्यवस्थापनासाठी आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे.

पाळी येण्यासाठी घरगुती उपाय / मासिक पाळी येण्यासाठी काही नैसर्गिक घरगुती उपाय. (Some Natural Home Remedies For Irregular Periods Treatment)

अनियमित मासिक पाळीवरील काही नैसर्गिक घरगुती उपचार आणि उपाय खाली दिले आहेत. / पीरियड्स रेगुलर येण्यासाठी काही उपाय खाली दिले आहेत

१. आल्याचा चहा (जिंजर टी/Ginger Tea)

सर्दीपासून ते अनियमित मासिक पाळी अशा अनेक आरोग्यविषयक समस्यांवर आले हे गुणकारी आहे. आल्याचे नियमित सेवन केल्यामुळे तुमची मासिक पाळी नियमित होते आणि अनियमित मासिक पाळीपासून मुक्तता होते. असंही म्हटलं जातं की मासिक पाळीच्या पहिल्या दोन तीन दिवसात होणार्‍या वेदनाही आल्याच्या सेवनामुळे कमी होतात. तसेच मासिक पाळीदरम्यान जाणार्‍या रक्ताचे प्रमाण कमी करण्यासही मदत होते. तेव्हा आता अद्रकवाली चाय बाजूला ठेवून यापुढे फ़क्त तीन घटकांचा वापर करून आल्याचा चहा बनवण्याचा प्रयत्न करूया. यासाठी कशाचा वापर कराल? - पाणी, आले आणि मध.

२. तीळ (Sesame Seeds)

शरीरातील तापमान वाढवण्यासाठी तीळ मदत करतात त्यामुळे तुमची मासिक पाळी नियमित येण्यासाठी मदत होते. मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळावा यासाठी देखील तुम्ही तिळाचे सेवन करू शकता. आणि हो, तीळ हे मासिक पाळीच्या दिवसात येणार्‍या थकव्याचा सामना करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त उर्जाही प्रदान करतात. आमच्या पोतडीतला हा एक नामी उपाय आहे.

३. गूळ (Jaggery)

अगदी आल्याप्रमाणेच गुळामध्ये देखील अनेक औषधी गूणधर्म आहेत. तसेच तुमची गोडाची आवडही पूर्ण होते कारण हा पदार्थ अतिशय स्वादिष्ट आहे. जर तुम्हाला तुमची मासिक पाळी नियमित यावी असं वाटत असेल तर तुम्ही तुमची मासिक पाळी येईस्तोवर दररोज गूळ खाऊ शकता. यात दाह आणि अनियमितता (spasmodic) विरोधी गूणधर्म आहेत त्यामुळे तुमच्या मासिक पाळीच्या दरम्यान येणारे गर्भाशयाचे पेटके कमी करण्यास मदत होते.

४. दालचिनी (Cinnamon)

मासिक पाळीच्या अनेक समस्यांवर दालचिनी अत्यंत उपयुक्त आहे. २०१४ मध्ये केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की दालचिनी अनियमित मासिक पाळी नियमित करते. त्याचप्रमाणे पीसीओएस असलेल्या महिलांसाठी, हार्मोनल असंतुलनामुळेयेणार्‍या अनियमित मासिक पाळीवर हा एक प्रभावी उपचार ठरू शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात दालचिनीचा वापर मसाला म्हणून जेवणामध्ये करण्याची करण्याची आवश्यकता नाही, तर त्याऐवजी तुम्ही दालचिनीच्या पाण्याचेही सेवन करू शकता. एक इंच दालचिनी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसर्‍या दिवशी सकाळी उकळा. तेवढं पुरेसं आहे.

५. ऍपल सायडर व्हीनेगर (Apple Cider Vinegar)

ऍपल सायडर तुमचं शरीर डीटॉक्स करून तुमची मासिक पाळी नियमित करंण्यास मदत करू शकते. परंतु ऍपल सायडरची चव कडू असल्यामुळे तुम्ही रोज याचे सेवन करणे टाळता. तेव्हा स्वाद आणण्यासाठी ते पाण्यात मिसळा आणि त्यात एक चमचा मध घाला. तसेच तुम्ही ते दुधातही मिसळू शकता.

६. अननस (Pineapple)

अननस हा अनियमित पाळीवरचा एक लोकप्रिय आणि सहज असा मासिक पाळी येण्यासाठी घरगुती उपाय आहे. तो चविष्ट असतो आणि त्यात ब्रोमलेन नावाचे विशिष्ट जैव उत्प्रेरक (एन्झाइम) असते जे गर्भाशयाच्या अस्तराला मऊ करतं, मासिक पाळी नियंत्रित करतं. त्यात दाह विरोधक आणि वेदनाशामक गूणधर्म देखील आहेत त्यामुळे पाळीच्या दरम्यान येणारे पेटके आणि डोकेदुखी दूर होते. याशिवाय अननस रक्तप्रवाह सुरळीत करतो आणि लाल व पांढर्‍या रक्तपेशींच्या निर्मितीसाठी मदत करतो. तुम्ही तो जेवणानंतर कच्चा खाऊ शकता किंवा तिखट गोड चव हवी असेल तर तुम्ही तुमच्या सलाड म्हणून स्वाद घेऊ शकता.

७. कच्ची पपई (Unripe Papaya)

तुम्ही याबद्दल शेजारच्या काकूंकडून किंवा तुमच्या आजी आजोबांकडून ऐकलं असेल किंवा ऑनलाइन पाहिलं असेल. मासिक पाळी नियमित येण्यासाठी घरगुती उपाय मध्ये कच्ची पपई हा भारतामधील सर्वात लोकप्रिय उपायांपैकी एक उपाय आहे. न पिकलेल्या कच्च्या पपईचे सेवन केल्यामुळे मासिक पाळी नियमित होते कारण ती गर्भाशयातील स्नायुंच्या तंतूना आकुंचन पावण्यास मदत करते. पपईमध्ये कॅरोटीन नावाचे पोषक तत्वदेखीला आहे जे हार्मोनल असंतुलन संतुलित करण्यास मदत करते.एक महत्वाचा इशारा:तुमच्या मासिक पाळीच्या दरम्यान कच्ची पपई खाऊ नका. त्यामुळे तुमच्या गर्भाशयाचे आकुंचन भयानकरित्या वाढून तुमच्या मासिक पाळीच्या वेदना वाढवू शकते. 

८. एरंडेल तेल (Castor Oil)

एरंडेल तेलाचे आल्यासह वर्गीकरण एमेनेगॉग म्हणून केले जाते. एमेनेगॉग म्हणजे मासिक पाळीला चालना देणारा अथवा वाढवणारा असा कोणताही पदार्थ. त्यामुळे जळजळ, मासिक पाळीतील वेद्ना, आणि पेटके कमी होऊ शकतात. तुमच्या व्हेज सलाड मिक्समध्ये किंवा फ़्रुट सलाड मध्ये एक छोटा चमचा एरंडेल तेल टाका. मोठ्या प्रमाणात एरंडेल तेल विषारी ठरु शकते म्हणून योग्य प्रमाणाची काळजी घ्या.

९. कोरफडीचा रस (ऍलोवेरा ज्युस/Aloe Vera)

कोरफडीचा रस हा तुमची मासिक पाळी नियमित करण्यासाठी, हार्मोनल असंतुलन संतुलित करण्यासाठी आणि अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी एक उत्कृष्ट उपाय आहे. त्यामुळे तुमचे चयापचय देखील वाढते आणि पचन संस्था निरोगी राहते. पण तुमच्या मासिक पाळीच्या वेळी ज्या कारणासाठी कच्ची पपई खाऊ नये त्याच कारणासाठी कोरफडीचा रसही पिऊ नये.

१०. बीटरूट (Beetroot)

आणखी एक एमेनेगॉग. बीटरूटस मासिक पाळी नियमित येण्यासाठी मदत करते तसेच रक्तातली हिमोग्लोबिनची पातळीही वाढवते. हे दाह विरोधक तर आहेच शिवाय तुमची पचन संस्थाही निरोगी ठेवते.

११. हळद (Turmeric)

हळदीत कर्क्युमिन असते ज्यामुळे जळजळ कमी करण्याबरोबरच मनाला उभारी मिळण्यासारखे अनेक आरोग्य विषयक फ़ायदे होतात. त्यामुळे पीएमएसची लक्षणं असलेल्या स्त्रिया कोमट दूधात किंवा नेहमीच्या आहारात मिसळून त्याचा लाभ उचलू शकतात. हे सांगणं योग्य ठरेल की हळद हा मासिक पाळी नियमित येण्यासाठी घरगुती उपाय आहे.

१२. इविनिंग प्राइमरोज तेल (evening Primrose Oil)

अनियमित मासिक पाळीवरील आणखी एक घरगुती उपाय म्हणजे गॅमा-लिनोलेनिक ऍसिड (GLA), ओमेगा ६ फॅटी ऍसिड तेल जे इविनिंग प्राइमरोज तेलामधील मुख्य घटक आहे, त्यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होते. पण अजुनही ह्याबाबतीत एकवाक्यता नसल्याने ते घेताना डॉक्टरांचा सल्ला आणि अधिक खबरदारी घ्या.

१३. मगवॉर्ट (Mugwort)

मासिक पाळी नियमित करण्यास मगवॉर्ट मदत करते कारण त्याचा हार्मोनल स्तरावर चांगला प्रभाव पडतो असे काहीजण मानतात, पण त्याचे वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत. अनियमित मासिक पाळीवर उपचार म्हणून त्याचा वापर करण्याआधी व्यावसायिक आरोग्यतज्ञांचा सल्ला घ्या.

Our products

RIO Heavy Flow Sanitary Pads

RIO Cottony Soft Sanitary Pads

RIO Comfort Weave Sanitary Pads

मासिक पाळी उशीरा येत असल्यास काय करावे - घरगुती उपाय / मासिक पाळी येण्यासाठी काय करावे - घरगुती उपाय (What to do when periods are late - home remedies)

.योग्य प्रमाणात वजन राखा (Maintain a Healthy Weight)

अनियमित पाळीबद्दल जर तुम्हाला काळजी वाटत असेल तर वजन नियंत्रणात ठेवा. तुमचे वजन तुमच्या नियमित पाळीत अडथळा ठरू शकते. जर तुमचे वजन जास्त असेल तर मासिक पाळी नियमित येण्यासाठी वजन कमी करणे उपयोगी ठरेल. पण प्रमाणापेक्षा जास्त वजन कमी करू नका.

. कमी कर्बोदकाचा आहार वगळा (Skip the Low Carb Diet)

कमी कर्बोदक असलेला आहार वगळल्याने मासिक पाळी नियमित होण्यात सुधारणा होते कारण कर्बोदकं हार्मोन्सच्या नियंत्रणासाठी आवश्यक आहेत आणि अतिशय कमी कर्बोदकं असलेला आहार मासिक पाळीत अडथळा ठरू शकतो.

. नियमित व्यायाम करा (Get Regular Exercise)

नियमित व्यायाम हा तुमच्या उत्तम आरोग्यासाठी, वजन व्यवस्थापनासाठी पीसीओएस चा सामना करण्यासाठी सहजरित्या मदत करतो. एनसीबीआयच्या अभ्यासानुसार व्यायाम हा मासिक पाळीच्या वेदनांशी सामना करणारा जणू सुपर हिरोच असल्याचे सिद्ध झाले आहे. मासिक पाळी नियमित येण्यासाठी व्यायाम हा उत्तम उपाय आहे.

.चांगली झोप घ्या  (Practice Good Sleep Habits)

तरुण व सुंदर दिसण्यासाठी शांत गाढ (ब्युटी स्लीपची) झोपेची आवश्यकता केवळ बॉलिवूड स्टारसाठीच नसते. चांगली झोप घेतलीत तर तुमची पाळी नियमित होण्यास चांगली मदत होते. चांगल्या झोपेची सवय पाळी नियमित करण्यासाठी लक्षणीयरित्या मदत करू शकते.

. ताण कमी करा (Reduce Stress)

तणावमुक्ती ही मासिक पाळीच्या उत्पातावर असलेली उत्तम गुरूकिल्ली आहे. अनियमित मासिक पाळीवर जर तुम्ही उपचार शोधत असाल तर तणावमुक्तीच्या तंत्राने मनःशांती मिळवू शकता आणि तुमच्या अनियमित मासिक पाळीच्या चिंतेला मागे टाकू शकता.

तुम्ही डॉक्टरांना कधी भेटायला हवं? (When Should You See a Doctor?)

तुम्हाला तुमच्या मसिक पाळीत अधून मधून बदल जाणवले आहेत का? तर ताणतणाव किंवा जीवनशैलीतील घटकांमुळे तसे घडू शकते. परंतू सतत असणारी अनियमित मासिक पाळी ही मूलभूत आरोग्याच्या समस्यांकडे निर्देश करते. तर डॉक्टरांना भेट द्यायला विसरू नका आणि त्यांना तुमच्या मूलभूत आरोग्य समस्यांचे निदान करू द्या व तुमच्या गरजेप्रमाणे अनियमित मासिक पाळीवर उपचार करू द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

१. पाळीचा कालावधी नियमित होण्यास किती वेळ लागतो? (How long does it take for a period to regulate?)

अमेरिकन कॉलेज ऑब्स्टेटिशियन्स आणि गायनोकॉलॉजिस्ट (ACOG) यांच्या मते, मासिक पाळी सुरू झाल्यावर तुमचं चक्र (सायकल) नियमित होण्यासाठी सुमारे सहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. काही घरगुती उपायांमुळे तुम्हाला सतावणार्‍या अनियमित मासिक पाळीवर घरबसल्या नियंत्रण ठेवण्यास सहजरित्या मदत होईल.

२. अनियमित मासिक पाळी म्हणजे वंध्यत्व, असा अर्थ होतो का? (Does irregular menstruation mean infertility?)

अनियमित मासिक पाळी म्हणजे वंध्यत्व, असा याचा अर्थ नाही. कारण त्यासाठी ताणतणाव, हार्मोनल असंतुलन यांसारखे अनेक घटक कारणीभूत असतात. तथापि गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असताना अनियमित पाळीमुळे अडथळे उभे राहू शकतात, त्यामुळे प्रजनन क्षमतेसंदर्भात समस्या निर्माण झाली असेल तर योग्य उपाययोजनांसाठी व्यावसायिक आरोग्यतज्ञांशी सल्लामसलत करणं आवश्यक आहे.

३. मासिक पाळी नियमित नसली तर तुम्ही गर्भवती राहू शकता का? (Can you get pregnant with irregular periods?)

होय. मासिक पाळी नियमित नसली तरी तुम्ही गर्भवती राहू शकता. परंतू अनियमित मासिक पाळीमुळे ओव्ह्युलेशनचा (प्रजननक्षम काळाचा) अचूक अंदाज करणं आव्हानात्मक ठरू शकतं, ज्यामुळे गर्भधारणेच्या वेळेवर परिणाम होऊ शकतो. व्यावसायिक आरोग्यतज्ञांचा सल्ला घेतल्यास ही काळजी दूर करण्यास आणि गर्भधारणेच्या शक्यतेस गती देण्यास मदत होऊ शकते.

Comments

facebook twitter whatsapp whatsapp
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Start using RIO Heavy Flow Pads during your heavy flow

Anti-bacterial SAP

Guards not wings

Odour lock

x

RIO is at the centre of every peRIOd!

Sign up to stay connected with us!